tukaram mundhe 
नागपूर

मुंढे साहेब, हे अतिक्रमण काढण्याची हिंमत दाखवाच... 

सकाळवृत्तसेवा

नागपूर : पीकेव्हीच्या बजाजनगर काछीपुरा येथील जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून 
बळकावलेल्या जागेवर दुकानदारी थाटलेल्यांचे अतिक्रमण काढण्याची हिंमत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दाखवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आमदार विकास ठाकरे यांनीसुद्धा पीकेव्हीच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या धनाढ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत केली आहे. 

पीकेव्हीच्या काछीपुऱ्यातील शेकडो एकर जागा बळकावण्यात आली आहे. त्यावर मोठमोठे लॉन थाटण्यात आले आहेत. मंगल कार्यासाठी ते भाड्याने दिले जातात. खाणावळींची येथे चंगळच आहे. एका नेत्याने येथे आपले राजकीय कार्यालयच थाटले आहे. या कार्यालयात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची उठबस असते. शेजारीच वासवी लॉन आहे. त्याचाही व्यावसायिक वापर केला जात आहे. यापूर्वी अनेकदा महापालिकेने येथे दुकानदारी थाटलेल्यांना नोटीस बजावल्या होत्या. मात्र, राजकीय वरदहस्त असल्याने त्यांचे कोणीच काही बिघडऊ शकले नाही. 

पीकेव्ही पत्रव्यवहार करून थकली आहे. पीकेव्हीने ही जागा एका प्रकल्पासाठी नागपूर सुधार प्रन्यासला देण्याची तयारीसुद्धा दर्शवली होती. मात्र, कोर्टकचेऱ्यांच्या माध्यमातून हा प्रकल्पच रोखण्यात आला. त्यामुळे आता बिनदिक्कतपणे या जागेचा वापर केला जात आहे. कोणी कारवाईसाठी आले की कोर्टकचेऱ्यांचा दाखला देऊन परत पाठवले जाते. 

आयुक्तांना खरोखरच शहराला अतिक्रमणमुक्त करायचे असले तर आधी धनाढ्यांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी फुटपाथ दुकानदारांतर्फे करण्यात आली आहे. श्रीमंत, व्यावसायिकांचे अतिक्रमण महापालिकेला दिसत नाही. मात्र, पोटापाण्यासाठी छोटेमोठे व्यवसाय करणाऱ्यांना हुसकावून लावले जाते हा कुठला न्याय आहे असाही सवाल फुटपाथ दुकानदारांचा आहे. 

विधानसभेत वेधले लक्ष 
पश्‍चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनीसुद्धा विधानसभेत पीकेव्हीच्या जागेवरच्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. त्यांनीसुद्धा धनाढ्यांचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नियमावर बोट ठेऊन चालणारे आयुक्त मुंढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT